पुणे - धानोरी लोहगाव परिसरातील नागरिक महापालिकेकडे करोडो रुपयांचा कर भरत आहेत. पण त्यांना शुद्ध पाणी, चांगले रस्ते स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांपासून देखील वंचित राहावे लागत आहे. वारंवार अर्ज विनंती करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने या विरोधात आज धानोरी, लोहगाव रेसिडेंट असोसिएशन तर्फे पुणे महापालिकेच्या दारात निदर्शने करण्यात आली.