Pune Municipal Corporation : महापालिका कार्यालयातच पाणीगळती ; दररोज हजारो लिटर पाणी वाया,विश्रांतीनगरमधील स्थिती

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी स्थिती पुणे महापालिकेची झाली आहे. एरव्ही पुणेकरांना ‘पाणी वाचवा’चा संदेश देणाऱ्या महापालिकेच्या कार्यालयातूनच दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सिंहगड रस्त्याला विश्रांतीनगरजवळ महापालिकेचे कार्यालय आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

सिंहगड रस्ता : ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी स्थिती पुणे महापालिकेची झाली आहे. एरव्ही पुणेकरांना ‘पाणी वाचवा’चा संदेश  देणाऱ्या महापालिकेच्या कार्यालयातूनच दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.  सिंहगड रस्त्याला विश्रांतीनगरजवळ महापालिकेचे कार्यालय आहे.  ही जागा महापालिकेचा दवाखाना अर्थात बाह्य रुग्ण विभागासाठी आरक्षित करण्यात आली आहे.  येथे कोरोना काळात लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आधार कार्ड संदर्भात तसेच महा-ई सेवा संदर्भात कामे येथे होत होती.म्हणून नागरिकांचा सातत्याने येथे वावर होता.  सध्या बाह्य रुग्ण विभाग आणि इतर सेवा या ठिकाणी दिल्या जातात. 

Pune Municipal Corporation
Pune Accident : वाघोलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत अपघाताच्या प्रमाणात वाढ

कार्यालयासाठी पिण्याच्या  पाण्यासाठी  नळजोड देण्यात आला आहे.त्याद्वारे संपूर्ण इमारतीला पाणीपुरवठा होतो. परंतु, पाण्याची टाकी भरल्यानंतर पुढील संपूर्ण वेळ पाणी तसेच वाहत असते, किंवा खाली कोणी नळ सुरू केला तर तो बंद करण्याची तसदी कोणी घेत नाही. आजूबाजूला असलेल्या सोसायटीतील नागरिकांनी वाया जात असलेल्या पाण्याबद्दल वारंवार सूचना दिल्या.

महापालिकेला ऑनलाइन पद्धतीने कळविण्यात आले. अधिकाऱ्यांना देखील कळवण्यात आले. परंतु, याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून नळ बंद करण्याची तसदी घेतली जात नाही.दररोज येथून हजारो लिटर पाणी तेही पिण्याचे वाया जात आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. पाणी कपातीचे संकट आहे. पाणी बचत करणे आवश्यक असताना दिव्याखाली अंधार याप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  यावर तत्काळ कारवाई करण्यात येऊन वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

महापालिकेची इमारत असल्यामुळे येथे कर्मचारी वर्गाकडून पाण्याच्या संदर्भात फारसे लक्ष दिले जात नाही. वारंवार कळवून देखील नळ बंद केला जात नाही. बऱ्याचदा आम्ही स्वतः किंवा आमच्या सोसायटीचे सुरक्षारक्षक तेथील वाया जाणारे पाणी निदर्शनास आल्यावर बंद करतात. 

- प्रिया साने, नागरिक

पाणी वाया जाण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवूनही त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- संदीप खलाटे, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता, क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com