कोल्हापूर:धरणात दहा टक्के पाणीसाठा राखून ठेवा; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर:धरणात दहा टक्के पाणीसाठा राखून ठेवा; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Published on: 

धरणात दहा टक्के पाणीसाठा राखून
ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : एल-निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक धरणातील पाण्याचा मृतसाठा वगळून दहा टक्के पाणी राखीव ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भालकर, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नळयोजना व जलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करावी. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवावा. त्यामुळे उपलब्ध पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल. धरण क्षेत्रातील गळती दुरुस्तीची कामेही प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी शक्तीकदम, कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांच्यासह जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com