
पुणे : पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्प्यात आले असले तरी अजूनही सुमारे लाखभर सोसायट्यांना पाणी मिटर बसविण्यात आले नाही. अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने हे काम संथ गतीने सुरु झाले. मात्र, आता प्रशासनाने कडक भूमिका घेऊन सोसायट्यांना पत्र पाठविण्यास सुरुवात केली आहे. पाणी मिटर बसवू द्या अन्यथा पाणी बंद केले जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.