esakal | मावळातील तिनही धरणांतून विसर्ग सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

water release form dam

सुमारे पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. परंतु मंगळवारी रात्रीपासून दमदार पावसाला सुरवात झाली. बुधवारी सकाळी (ता. 4) संपलेल्या चोवीस तासांत वडगाव येथे 54, तळेगाव दाभाडे येथे 50, कामशेत येथे 124, कार्ला येथे 153, पवनानगर येथे 106, वडिवळे येथे 96, लोणावळा येथे 210, तर शिवणे येथे 28 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्‍यातील धरणे यापूर्वीच शंभर टक्के भरली आहेत.

मावळातील तिनही धरणांतून विसर्ग सुरू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्‍यात मंगळवारी रात्रीपासून (ता. 3) पावसाचा जोर वाढल्याने महत्त्वाच्या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला. 

सुमारे पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. परंतु मंगळवारी रात्रीपासून दमदार पावसाला सुरवात झाली. बुधवारी सकाळी (ता. 4) संपलेल्या चोवीस तासांत वडगाव येथे 54, तळेगाव दाभाडे येथे 50, कामशेत येथे 124, कार्ला येथे 153, पवनानगर येथे 106, वडिवळे येथे 96, लोणावळा येथे 210, तर शिवणे येथे 28 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्‍यातील धरणे यापूर्वीच शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे बुधवारी पहाटेपासून सर्व धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला. पवना धरणातून प्रतिसेकंद सहा हजार, वडिवळे धरणातून 2 हजार 500 तर आंद्रा धरणातून 1 हजार 400 क्‍युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात येत होते. सकाळी 11 वाजता पवनातील विसर्ग 12 हजार 600 क्‍युसेक तर वडिवळे धरणातील विसर्ग 4 हजार 400 क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे नद्या नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत. 

भातासाठी उपयुक्त 
पावसाने सुमारे पंधरा दिवसांची उघडीप दिल्याने भातासह अन्य खरीप पिकांसाठी पावसाची आवश्‍यकता होती. गरजेच्या वेळी पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

loading image
go to top