खडकवासला - खडकवासला धरणातून १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सुरू असलेला १२५४ क्युसेक विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, सुमारे ३१ तासांनंतर १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता पुन्हा १२६३ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला..सध्या खडकवासला जलसंपदा संकुलातील सर्व चार धरणांमध्ये मिळून २९.०६ टीएमसी म्हणजे ९९.७० टक्के साठा आहे. यामध्ये पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे १०० टक्के भरली असून खडकवासला धरणात ९६ टक्के साठा आहे. आवश्यकतेनुसार विसर्गात बदल होऊ शकतो, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली..कात्रज बोगदा परिसरात ४५ मिमी पाऊसखडकवासला - धरण परिसरात संध्याकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत १५ मिमी पाऊस झाला. टेमघर परिसरात १७ मिमी पाऊस पडला. खडकवासला धरणाच्या लाभक्षेत्रात वडगाव, धायरी, नांदेड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धायरी-नांदेड रस्त्यावरील जाधवनगर, गोसावी वस्ती परिसरात तसेच नांदेड येथील गणेश मंगल कार्यालयाजवळ रस्त्यावर पाणी साचले होते. धायरी गावातील चव्हाण बाग व गावठाण परिसरातही पाणी साचले होते.कात्रज बोगदा परिसरात ४५ मिमी पाऊस पडला. नऱ्हे, आंबेगाव परिसरातही मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली. त्यामुळे महामार्ग सेवा रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला..एनडीएत ७१ मिमी पाऊसशिवणे - शिवणे गावाजवळील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात ७१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे व वारजे-माळवाडी परिसरात दुपारी चार ते पाच दरम्यान मुसळधार पाऊस झाला.कोथरूड येथील भुसारी कॉलनी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. डुक्कर खिंडीतून वारजे बाजूकडे सेवा रस्त्यावरून पाणी वाहत होते. वारजे येथील मंगेशकर रुग्णालयासमोरील परिसरात पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली. वारजे हायवे चौकातही पाण्याचा मोठा प्रवाह आला..गणपती माथा ते शिंदेपूल परिसरात वारजेकडून शिवणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ठिकाणी अर्धा ते एक फूट पाणी साचले. त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यालगतच्या पादचारी मार्गावरून पाणी दुसऱ्या बाजूला वाहत होते. हेच पाणी पुढे दांगट पाटीलनगर, दांगट इंडस्ट्रीयल व दांगट वस्ती परिसरातून रस्त्याने वाहत होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.