गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दुरदृष्टीकोणाचा होतोय शेतकऱ्यांना फायदा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kukdi rivar

कुकडी नदीला सोडले पाणी, पाटबंधारा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती

sakal_logo
By
युनूस तांबोळी ः सकाळ वृत्तसेवा

टाकळी हाजी ः पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्यावर आऊटलेटचे बांधकाम केल्यामुळे शिरूर तालुक्यातील कुकडी नदीला सध्या पाणी सोडण्यात आले आहे. कुकडी नदी कोरडी पडली असल्याने शेतकऱ्यांमधून पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कुकडी नदीला पाणी सोडण्यात आल्याची माहिती कुकडी पाटबंधारा विभागाचे उपविभागीय अधिकारी सुहास साळवे यांनी दिली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

शिरूर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या म्हस्केवाडी जवळ कुकडी डावा कालवा 31 किलोमीटर वर शिर्ष विमोचक बांधकाम भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत करण्यात आले होते. ऐन उन्हाळ्यात कुकडी नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार निलेश लंके व पोपटराव गावडे यांच्या पाठपुराव्याने उन्हाळ्यात कोरडी पडणाऱ्या कुकडी नदीला हे पाणी सोडण्यात आले आहे.

त्यानुसार शिरूर तालुक्यातील जांबूत, सरदवाडी, बाबरमळा, वडनेर, माळवाडी या भागातील शेतकऱ्याला हे पाणी उपलब्ध होणार आहे. साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होणार आहे. 1500 क्युसेकने सोडण्यात आलेले हे पाणी आज रात्रीपर्यंत जांबूत परीसरापर्यंत पोहचेन असेही साळवे यांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या पाण्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

दुरदृष्टीमुळे उन्हाळ्यात पाणी-ऐन उन्हाळ्यात कुकडी नदी कोरडी पडून या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची समस्या जाणवत होती. या काळात पिकेही करपून जात होती. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दुरदृष्टीतून भिमाशंकर कारखान्याच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी 34 लक्ष 49 हजार 154 रूपयांचा कुकडी डावा कालव्यावर आऊटलेटचे बांधकाम केले होते. त्याचा फायदा होऊन सध्या ऐन उन्हाळ्यात कुकडी नदीला पाणी येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

loading image
go to top