उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील अतिक्रमणे कराराने कायम करण्याचे धोरण - जलसंपदा मंत्र्यासोबतच्या बैठकीतील माहिती - रणजितसिंह शिंदे

उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील अतिक्रमणे कराराने कायम करण्याचे धोरण - जलसंपदा मंत्र्यासोबतच्या बैठकीतील माहिती - रणजितसिंह शिंदे

Published on

MDH26B05165
मुंबई ः माढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत चर्चा करताना रणजितसिंह शिंदे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर.

उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील अतिक्रमण कराराने काय करणार
रणजितसिंह शिंदे यांची माहिती; जलसंपदा मंत्र्यासोबतच्या बैठक

माढा, ता. ५ : उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात झालेली अतिक्रमणे कराराने कायम करण्याचे व माढा तालुक्यातील भीमानगर-रांझणी येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमण करून बांधलेली खासगी घरेही कायम करण्याचे धोरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन देऊन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत माढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी बैठक लावण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे बुधवारी (ता. ४) जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत. ती काढण्याच्या संदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. त्या नोटीसा तेथील शेतकरी व मच्छिमार यांचे हित लक्ष देऊन थांबविण्यात याव्यात यासाठी जलसंपदामंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. सकारात्मक विचार करून जलसंपदामंत्र्यांनी ती अतिक्रमणे कराराने कायम करण्याचे धोरण शासनाचे असल्याचे सांगितले.
बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ, जि. प. सदस्य अण्णासाहेब ढाणे, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com