Otur News : कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभुळशी येथील पाणीटंचाई दूर होणार! १०० एमसीएफटी क्षमतेच्या बंधाऱ्याच्या (एम आय टॅंक) सर्वेक्षणासाठी २६.५० लाखांचा निधी मंजूर, सुनेत्रा पवार यांचे निर्देश

जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम कोपरे, मांडवे, मुथाळणे आणि जांभूळशी या आदिवासी गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
dcm sunetra pawar, sonabai dabhade and atul benake

dcm sunetra pawar, sonabai dabhade and atul benake

sakal

Updated on: 

ओतूर - जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम कोपरे, मांडवे, मुथाळणे आणि जांभूळशी या आदिवासी गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या गावांसाठी १०० एमसीएफटी क्षमतेचा बंधारा उभारण्याच्या प्रस्तावाच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २६ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या प्रशासकीय मान्यता पत्रामुळे बंधाऱ्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...