Pune Water Scarcity : तर पुणेकरांवर तीव्र पाणीकपातीचे संकट येईल - प्रशांत जगताप

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षी या काळात २७.६० दशलक्ष घनफूट (टीएमसी) होता. तो आता २१.२५ ‘टीएमसी’ वर आला आहे.
Pune Water Crisis

Pune Water Crisis

sakal

Updated on: 

पुणे - पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षी या काळात २७.६० दशलक्ष घनफूट (टीएमसी) होता. तो आता २१.२५ ‘टीएमसी’ वर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो यावर्षी ६ ‘टीएमसी’ने घटल्याने पुणेकरांवर येत्‍या उन्हाळ्यात तीव्र पाणीकपातीचे संकट ओढवले जाण्‍याची शक्‍यता आहे. या गंभीर प्रश्नावर जलसंपदामंत्री, मुख्यमंत्री, खासदार, सात आमदार आणि महापौर यांनी तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केली.

Loading content, please wait...