सोलापूर- जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; १६५ गावांना १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर- जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई;  १६५ गावांना १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
Published on: 

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

१६५ गावांना १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा; ७० जलस्रोत अधिग्रहित

ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, जिल्ह्यातील १६५ गावे आणि ८५३ वाड्यांमधील तब्बल ३ लाख ३७ हजार ४३ नागरिक आणि ९८ हजार ९५९ पशुधनाला सध्या १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय टंचाईवर मात करण्यासाठी ४४ विहिरी आणि २६ बोअर असे एकूण ७० जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड यांनी दिली.
तालुकानिहाय टँकरच्या स्थितीचा विचार करता, मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक ४२ गावांना ४५ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. याखालोखाल सांगोला २८ गावे (३९ टँकर), अक्कलकोट १८ गावे (१३ टँकर), माढा १५ गावे (१९ टँकर), बार्शी १५ गावे (४ टँकर), करमाळा १३ गावे (१० टँकर), माळशिरस ११ गावे (११ टँकर), उत्तर सोलापूर ९ गावे (१६ टँकर), दक्षिण सोलापूर ७ गावे (१० टँकर) आणि मोहोळ तालुक्यातील ७ गावांना ११ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. सध्या फक्त पंढरपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नसून, उर्वरित सर्व टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे नियमित आणि सुव्यवस्थित पाणीपुरवठा सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com