

PGR26B03870
पांगरी (ता. बार्शी) : सिमेंटच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यावर तहान भागवणारे कावळे.
---
पांगरीत पाणीटंचाईचे सावट;
पक्ष्यांची पाण्यासाठी धडपड
‘खरीप’चे नुकसान; ‘रब्बी’वरही संकट
सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. २२ : बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात अल्प पावसामुळे पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. खरीप पिकांचे नुकसान आणि रब्बीच्या पेरणीची चिंता असतानाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. पांगरी पोलिस ठाण्याच्या आवारात झाडांना पाणी घातल्यानंतर सिमेंट रस्त्यावर साचलेल्या थोड्याशा पाण्यावर तहान भागवणारे कावळे या परिस्थितीचे बोलके चित्र ठरले.
पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून, काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर रोटावेटर फिरविले. नदी-नाले कोरडे पडल्याने आणि जमिनीतील ओलावा घटल्याने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा व भुईमूग या रब्बी पिकांच्या पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, शेतीच्या अर्थकारणावरही परिणाम होत आहे.
---
पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा
उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांनी घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा झाडाखाली पक्ष्यांसाठी स्वच्छ पाण्याची भांडी ठेवून त्यात नियमित पाणी भरावे. पाण्याची बचत आणि उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यासोबतच पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.