Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा या वर्षी १ जुलैला गेल्या दहा वर्षांतील सर्वांत खालच्या पातळीवर गेल्याने चिंता कायम.
khadakwasla dam water storage

khadakwasla dam water storage

sakal

Updated on

खडकवासला - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा या वर्षी १ जुलैला गेल्या दहा वर्षांतील सर्वांत खालच्या पातळीवर गेल्याने चिंता कायम आहे. धरणात यंदा १५.४७ टक्के उपयुक्त साठा आहे. पवना, वरसगाव आणि पानशेत धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा काही दुष्काळी वर्षांच्या तुलनेत समाधानकारक असला, तरी टेमघर धरणातील उपयुक्त साठा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. काही धरणांनी आशेचा किरण दाखविला असला, तरी एकूण स्थिती आगामी पावसावरच अवलंबून असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com