आंबेठाण - भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज (दि. २६) ५.४९ टीएमसी म्हणजे ६५.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीचा विचार करता हा साठा कमी असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ६८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून १२९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ६५.४६ टक्के म्हणजे ५.४९ टीएमसी आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा ५.०१ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ६८.५३ टक्के पाणीसाठा होता.
चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील दोन आवर्तने सोडण्यात आली असून त्याद्वारे आलेगाव पागा पर्यंत असणारे १८ बंधारे भरण्यात आले होते. तर पुढील उन्हाळी आवर्तन मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोडण्यात येणार आहे.
आगामी उन्हाळ्याची चाहूल आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाणी जपून वापरावे असे आवाहन सहाय्यक अभियंता ( श्रेणी १ ) अश्विन पवार,शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख,कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.