थांब्यांवर पाणपोई अन्‌ स्वच्छतागृह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरातील सांगवी-किवळे आणि दापोडी-निगडी या दोन मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू आहे. शिवाय, नाशिक फाटा-वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) असे दोन बीआरटी मार्ग तयार आहेत. मात्र, त्यावर अद्याप बससेवा सुरू नाही. या मार्गांवरील प्रत्येक थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई व स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था जलद करण्यासाठी महापालिकेने सांगवी फाटा-किवळे, पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी भक्ती-शक्ती चौक, भोसरी - नाशिक फाटा - वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या चार मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. दिघी ते आळंदी मार्गावरही बीआरटी सेवा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने मार्गाची बांधणी झाली आहे. या मार्गांवर थांबे उभारण्यास स्थायी समितीने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे. सध्या सांगवी फाटा ते किवळे व दापोडी ते निगडी या मार्गांवर बीआरटी सेवा सुरू असून, सर्वात जास्त प्रवासी संख्या या मार्गांवर असते. मात्र, मार्गावरील कोणत्याही थांब्यावर पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय व कुचंबना होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर बीआरटीच्या प्रत्येक बसथांब्यावर पाणपोई सुरू करणे व स्वच्छतागृह उभारणे, असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा सभेने केले आहे. या बाबतचा प्रस्ताव नगरसेविका सुलक्षणा धर आणि नगरसेवक नीलेश बारणे यांनी ठेवला होता. 

मी पुण्यातील शिवाजीनगरमधील कॉलेजात जातो. एक-दीड तासाचे अंतर आहे. त्यामुळे तहान लागते. पाण्याची बाटली सोबत असते. पण, त्यातील पाणी संपल्यावर पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. दररोज किमान वीस रुपये देणे परवडत नाही. कधीकधी कॉलेजमधूनच बाटलीमध्ये पाणी भरून घेतो. बसथांब्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यास सर्वांचाच फायदा होईल. 
- नीलेश पवार,  विद्यार्थी, त्रिवेणीनगर

Web Title: Water supply and sanitation on brt bus stop