पुण्यात 'या' भागातील पाणीपुरवठा उद्या बंद 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

पुणे महापालिकेकडून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या शुक्रवारी (ता. 18) देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रातंर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा त्या दिवशी बंद राहणार आहे.

पुणे -  पुणे महापालिकेकडून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या शुक्रवारी (ता. 18) देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रातंर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा त्या दिवशी बंद राहणार आहे. त्या भागांना दुसऱ्या दिवशी (शनिवारी) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाणी पुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महमंदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हांडेवाडी रोड, फुरसुंगी, येरवडा जेल, संगमावाडी, शांतीनगर, भारतनगर, प्रतिकनगर, मोहनवाडी, कल्याणीनगर, संपूर्ण वडगाव शेरी गावठाण, महावीर नगर, मल्हारनगर, ब्रम्हा सनसिटी परिसर, आगाखान पॅलेस समोरील परिसर, संपूर्ण कॅम्प भाग, मिलीटरीचा सर्व भाग, फातिमानगर, एनआयबीएम रस्ता, संपूर्ण घोरपडी, बी टी कवडे रस्ता, भीमनगर, हडपसर इंडस्ट्रियल एरिया इत्यादी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply from the army center will be closed tomorrow in pune