पुणे - शहरात पाणी कपात सुरू झाल्यानंतर आज (ता. १६) सकाळी शहराच्या विविध भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारनंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. .एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे खडकवासला धरणात गेल्यावर्षीपेक्षा साडेतीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने राज्य सरकारने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून (ता. १५) याची अंमलबजावणी सुरू झाली आहे..काल पाणी बंद असल्याने आज सकाळी वेळेवर पाणी येणे अपेक्षित होते. पण शहरातील मध्यवर्ती पेठा, खराडी, हडपसर, औंध, बोपोडी, बिबवेवाडी, कोंढवा या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काही भागात उशिरा पाणी आले, अनेक ठिकाणी पाण्याला दाब नसल्याने पाणी जास्त मिळाले नाही. पाणीपुरवठा विभागाकडे याच्या तक्रारी आल्यानंतर दुपारनंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला..पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘जलवाहिन्यांच्या शेवटच्या टप्प्यात (टेल एंड) जो भाग आहे तेथून पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आलेल्या होत्या. त्यानंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.