पुणे - चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवारी (ता.२८) खराडी, चंदननगर व वडगाव शेरी तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.1 मार्च) रोजी पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडुन देण्यात आली आहे.
चंदननगर येथील टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरुपाचे दुरुस्तीचे काम शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाकडुन केले जाणार आहे.
त्यामुळे खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमधील आनंद पार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी परिसर तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असणार आहे. शनिवारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.