हिंजवडी, माण परिसराला एमआयडीसीमार्फत वाढीव पाणी

हिंजवडी, माण परिसराला 
एमआयडीसीमार्फत वाढीव पाणी
Published on

पौड, ता. २४ : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाबाबत आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होणार आहे. तसेच हिंजवडी, माण, मारुंजी परिसराला एमआयडीसीमार्फत वाढीव पाणी दिले जाईल, अशी माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
मुंबईतील विधान भवनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत बैठक झाली. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते. पिरंगुट येथे अपघातग्रस्तांसाठी ''ट्रॉमा केअर सेंटर''ला मंजुरी देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले. तसेच निगुडघर (ता. भोर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय उदय सामंत यांनी घेतला. उरवडे, पिरंगुट, वेळू आणि शिंदेवाडी औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी दिला जाणार आहे. हिंजवडी, पिरंगुट परिसरातील घनकचरा व्यवस्थापन आणि पोलिस ठाण्याच्या जागेचे प्रश्नही तातडीने मार्गी लावले जातील, असे मांडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com