

water supply close
पुणे - पुणे महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी भक्ती-शक्ती चौक येथील जागतिक बँक मुख्य जलवाहिनी स्थलांतर आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (ता. २३) वडगावशेरी व चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागांतर्गत काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.