water tanker
sakal
पुणे - शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून, खासगी टँकर चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाण्यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांना अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने टँकरच्या दरांवर नियंत्रण आणून निश्चित दर जाहीर करावेत तसेच पाणीटंचाईचा गैरफायदा घेणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.