

टॅंकर वापरा
१३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार नागरिकांसह ९५ हजार पशुधनाला टँकरचा आधार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांची संख्या मोठी आहे. सध्या जिल्ह्यातील १३९ गावे आणि ७५२ वाड्यांमधील २ लाख ६२ हजार ४४९ नागरिकांसह ९५ हजार ९३२ पशुधनाला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या गावांना आणि वाड्यांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रशासनाकडून टँकरचा आधार घेतला जात आहे. याशिवाय पाणी उपलब्ध होण्यासाठी ४० विहिरी आणि २१ बोअर असे एकूण ६१ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी दिली.
जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक ४० टँकर सुरू असून, त्याद्वारे ३७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. सांगोला तालुक्यातील २६ गावांसाठी ३४ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. माढा तालुक्यात १४ गावांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या तीन तालुक्यांत मिळून ९० टँकर सुरू आहेत.
माळशिरस तालुक्यातील १० गावांसाठी १० टँकर, करमाळा तालुक्यातील १२ गावांसाठी नऊ, अक्कलकोट तालुक्यातील १५ गावांसाठी आठ, उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावांसाठी सात आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच गावांसाठी सहा टँकर सुरू आहेत.
बार्शी तालुक्यातील १३ गावांना तीन टँकरद्वारे, तर मोहोळ तालुक्यातील दोन गावांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पंढरपूर तालुक्यात सध्या एकही टँकर सुरू नसल्याची नोंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.