

Water Supply
ESakal
पुणे - घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जून २०२९ पर्यंतचे दर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्यात महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात (जलदर) दुपटीहून अधिक वाढ केली आहे. एक जुलैपासून पाण्याचे सुधारित दर लागू होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.