पाणीपट्टी वसुलीसाठी बार्शी पाटबंधारे विभागाची धडक कारवाई; थकबाकीदारांवर वीज कनेक्शन कटची कारवाई सुरू
VRG26B06297
वैराग ः जवळगाव धरण लाभ क्षेत्रातील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी बार्शी पाटबंधारे विभागाची धडक कारवाई करताना अधिकारी.
मध्यम प्रकल्पातील ३.४६ कोटींच्या थकबाकीसाठी कारवाई सुरू
बार्शी पाटबंधारे विभागाची कारवाई; वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात
वैराग, ता. २१ ः बार्शी पाटबंधारे उपविभागाच्या वतीने तालुक्यात पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. हिंगणी, जवळगाव व ढाळे पिंपळगाव या मध्यम प्रकल्पांसह पाथरी, चारे, वालवड, वैराग, काटेगाव, बाभूळगाव, कोरेगाव, कारी, ममदापूर, गोरमाळे, तावडी, शेळगाव आदी लघु प्रकल्पांअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ३ कोटी ४६ लाखांची थकबाकी आहे. यासाठी वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सध्या सुरू आहे.
या मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी २ कोटी ३१ लाख तर बिगर सिंचनासाठी १ कोटी १५ लाख रुपये थकीत आहेत. २०२५-२६ या वर्षासाठी शासनाने २ कोटी ५८ लाख वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये सिंचनासाठी २ कोटी व बिगर सिंचनासाठी ५८ लाखांचा समावेश आहे.
थकबाकी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने कठोर भूमिका घेतली असून, थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७९ अंतर्गत आणखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा विरेश परदेशी (उपविभागीय अधिकारी) यांनी दिला आहे.
१७ मार्च २०२६ अखेर ३३ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये सिंचनासाठी २७ लाख तर बिगर सिंचनासाठी ६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी १२ कर्मचारी कार्यरत असून हिंगणी व जवळगाव प्रकल्पांत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हिंगणी येथे ४० तर जवळगाव येथे ३५ मोटारधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, थकीत पाणीपट्टी तातडीने भरावी, अन्यथा पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

