पाषाणमध्ये हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

पाषाणमध्ये हजारो लिटर 
पाण्याचा अपव्यय
Published on: 

पाषाण, ता. १० : पाषाण रस्त्यावरील पंचवटी मुख्य प्रवेशद्वार चौकात पादचारी मार्गाखालील पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळतीमुळे मुख्य रस्त्यावर आयझर संस्थेच्या गेटसमोर ५०० चौरस फुटांचे पाण्याचे मोठे डबके साचले असून, हे पाणी पुढे एनसीएल इनोव्हेशन पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहत जात आहे.
पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे रस्त्यावर शेवाळ साचून मार्ग अत्यंत निसरडा झाला असून दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, साचलेल्या पाण्यातून वाहने गेल्याने ते पाणी अंगावर उडत असल्याने पादचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांमध्ये दररोज भांडणे होत आहेत. पिण्याच्या पाण्याचा होणारा हा अपव्यय तातडीने रोखण्यासाठी नागरिकांनी चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. येत्या ४८ तासांत हे चाचणीचे काम पूर्ण करून गळती न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

ही पाणी वाहिनी कित्येक वर्षे जुनी आहे. पंचवटी भागासाठी आता स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे, मात्र एनसीएलसाठी दररोज पाच लाख लिटर पाणी याच जुन्या वाहिनीतून पाणीपुरवठा करावा लागत होता. सध्या या परिसरात नवीन वाहिनी टाकण्यात आली असून, तिची चाचणी करण्याचे काम सुरू आहे.
- अनुप गजावर, कनिष्ठ अभियंता, चतु:शृंगी पाणीपुरवठा विभाग

गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्यावर हजारो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी वाया जात आहे. एकीकडे प्रशासन पाणी कपातीचे नियोजन करून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यावर होणाऱ्या या पाण्याच्या नासाडीकडे डोळेझाक करत आहे.
- मोहिनी सपकाळ, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com