
कात्रज : कात्रज-कोंढवा रोड भागात एक दिवस कपात पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार असल्याने संपूर्ण शहरात एकाच भागावर अन्याय का? या प्रश्नावर सकाळने कात्रज कोंढव्याचे पाणी मुरते कुठे? या मथळ्याखाली वृत्त छापल्यानंतर सकाळकडे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही केवळ एक दिवसाची पाणी कपात नाही. तर रोजच्या पाणीपुरवठ्यातही भरपूर कपात होते, असे केल्याने तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत विचारणा केली असता वरूनच पाणी कमी येत असल्याचे उत्तर मिळत असल्याचे सुखदा वरदा संकुल सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार कमलापुरे यांनी म्हटले.