
पुणे : शहरात एकीकडे मुसळधार पाऊस सुरु असताना दुसरीकडे आज (ता. २६) अर्ध्या पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळित झाल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सर्व पेठांसह सहकारनगर, दत्तवाडी, पद्मावती आदी भागातील नागरिकांची पाण्याअभावी तारांबळ उडाली. उद्यापासून (ता. २७) पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.