आम्ही लोकशाही पध्दतीने आंदोलन करतो

इंदापूरात विजतोडणीवरून आंदोलन
indapur
indapursakal

इंदापूर : आम्ही लोकशाही पध्दतीने विजतोडणी, वीज बिल माफी संदर्भात आंदोलन करतो आहे. मात्र तुम्ही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहात, तुम्हाला आंदोलन दडपण्यास लाज वाटत नाही. मी रीतसर निवेदनदेऊनआंदोलन करत आहे तरी तुम्ही धरपकड करतआहात, मी एसपी ना फोन लावेन. तुम्ही जेवायला बसल्यानंतर ताटातील भाकरी, चपातीकडे पहा, तुम्हाला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव होईल.

indapur
निमिषा झा, अमरेश मिश्रा यांना ब्रिटनची चेव्हनींग शिष्यवृत्ती जाहीर

त्यामुळे पोलीसांनो तुम्ही बंदुकाकाढा ,माझ्यावर गोळ्या झाडा, मी शेतकऱ्यांसाठी गोळ्या खाण्यास तयार आहे असे वक्तव्य महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले. प्रभाकर देशमुख यांनी इंदापूर महावितरण कंपनी समोर शेतकऱ्यांना वीज बिल माफी, कोरोना महामारी संचारबंदी काळात शेतकरी, व्यापारी व घरगुती ग्राहकांना शंभर टक्केवीज बिल माफी मिळावी तसेच इंदापूरतालुक्यातील तोडलेले वीजजोड तात्काळ जोडावेतयामागणी साठी जोरदार घोषणाबाजीसह हलगीनाद आंदोलन केले.

मात्र इंदापूरपोलीसांनीप्रभाकर देशमुख, ओमराजे कदम, रविराज काळे, अजय कदम या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन केवळ १५ मिनिटातच हे आंदोलन गुंडाळले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात बसवून घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या सरसकट वीजबिलमाफी या आश्वासनाची पूर्तता करावी.

indapur
पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच प्रभाग; निवडणूक आयोगाचे आदेश

कोरोना महामारीच्या दीड वर्षात शासन संचारबंदीमुळे अर्थकारण ठप्प झाल्यामुळे शेतकरी,व्यापारी व घरगुती ग्राहकांना १०० टक्के वीज बिल माफी द्यावी तसेच इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे सोडवलेले वीजजोड तातडीने जोडावेत या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्या पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

दरम्यान जनहित संघटनेचे तालुक्यातील पहिलेच आंदोलन झाले. यावेळी आंदोलक हाताच्या बोटावर मोजण्या इतके तर पोलीस फौजफाटा मात्र त्यांच्यापेक्षा पाचपट अशी स्थिती असल्याने आंदोलन संवेदनशील ठरले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आंदोलक व वीज वितरण कंपनीचे तालुका अभियंता रघुनाथ गोफणे यांची चर्चा घडवून आणली मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने हे आंदोलन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com