'केवळ लॉकडाउनने प्रश्न सुटणार नाहीत,आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे हा लढा अहोरात्र सुरू ठेवायचा असून,केवळ लॉकडाउनने प्रश्न सुटणार नाहीत,आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे,असे मत शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

पुणे - ""आपल्या डोळ्यांना न दिसणारा आणि कोणालाही होईल, अशा कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपण जगत आहोत. त्यात पावसाळा सुरू झाल्याने इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा लढा आपल्याला अहोरात्र सुरू ठेवायचा असून, केवळ लॉकडाउनने प्रश्न सुटणार नाहीत, आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे,'' असे मत मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

श्री ओंकारेश्वर देवस्थान आणि खासदार गिरीश बापट यांच्या वतीने कोरोनाबाधितांना जेवण आणि गरजूंना अन्नदान किट देण्याच्या कार्यात सहभागी समाजसेवी कार्यकर्त्यांचा सन्मान मंदिराच्या आवारात करण्यात आला. या वेळी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम्‌, मुख्य आयोजक देवस्थानचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट, प्रमुख विश्वस्त धनोत्तम लोणकर, स्वरदा बापट आदी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार बापट म्हणाले, ""कोरोनाच्या काळात सुमारे 10 हजार गरजू लोकांपर्यंत जेवण व अन्नधान्याचे किट पोचविले. खासदार मानधनातूनदेखील मदतीचा हात दिला. त्यासोबतच पोलिस, मनपा आणि ओंकारेश्वर देवस्थान, निनाद-पुणेसारख्या संस्था कोणताही मोबदला न घेता मदतीला पुढे आल्या.'' सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सुरू असलेली ही मदत केवळ सहभागी कार्यकर्त्यांमुळेच शक्‍य झाल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we must learn to live with Corona says shekhar gaikwad