टेमघरची गळती रोखण्यात आम्ही यशस्वी : गिरीष महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

"धरण सुरक्षा समितीने टेमघर धरणाची गळती 'अ' प्राधान्य गटाची म्हणजे, तातडीने दुरुस्ती करण्याचे सांगितले होती. राज्यातील तज्ञ व्यक्तीबरोबर, प्रथमच केंद्र सरकारच्या खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन काम केल्याने गळती रोखण्यात आम्ही यशस्वी झालो." असे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी शनिवारी टेमघरची पाहणी केल्यानंतर 'सकाळ' शी बोलताना ही माहिती दिली. 

खडकवासला : "धरण सुरक्षा समितीने टेमघर धरणाची गळती 'अ' प्राधान्य गटाची म्हणजे, तातडीने दुरुस्ती करण्याचे सांगितले होती. राज्यातील तज्ञ व्यक्तीबरोबर, प्रथमच केंद्र सरकारच्या खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन काम केल्याने गळती रोखण्यात आम्ही यशस्वी झालो." असे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी शनिवारी टेमघरची पाहणी केल्यानंतर 'सकाळ' शी बोलताना ही माहिती दिली. 

टेमघर धरणातून 2010 पासून गळती हाेत होती पण ती मर्यादित 70 लिटर प्रति सेकंद होती. ती 2500 लिटर प्रति सेकंद झाल्याचे 2016च्या धरण हेल्थ अहवालात आली. यामुळे, मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. महाजन यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी टेमघरला जाऊन धरणाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गळती पूर्ण बंद करण्यासाठी आवश्यक ती कामे हाती घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. 

त्यानुसार, 2016 मध्ये राज्यातील तज्ञ समितीबरोबर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेची यासाठी मदत घेण्याचे ठरविले.
त्यांच्या शास्त्रज्ञानी संशोधन करून उपाय योजना सुचविल्या. त्यानुसार, कार्यवाही करण्यात आली. अजून काम थोडे बाकी असताना गळती 90 टक्क्यांपर्यंत म्हणजे 250 लिटर प्रति सेकंद कमी झाली आहे. ती पुढील वर्षी यापेक्षा कमी गळती राहील. असे ही महाजन यांनी सांगितले. 

टेमघर धरण दुरुस्ती सुरू असताना यंदा शंभर टक्के भरले आहे. टेमघरमधून खडकवासला धरणात पाणी सोडले जाईल. शहराच्या पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी सोडून डिसेंबर 2019 पर्यंत धरण पूर्ण रिकामे करून उरलेली गळती थांबविण्याची कामे पूर्ण करण्यास सांगितले.
गळती दुरुस्तीच्या नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई जलसंपदा विभागाने करावी. असे ही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते,  पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, भामा आसखेड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे उपस्थित होते.

धरण गळती दुरुस्तीत, आता मुळशीतील 'टेमघर पॅटर्न'- सर्वाधिक गळणारे धरण म्हणून मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची राज्यभर प्रसिद्धी होती. परंतू हे धरण गळतीमुक्त करण्यासाठी ग्राऊंटींग व शॉर्टक्रीट तंत्रज्ञान वापरल्याने जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नास 90 टक्के यश मिळाले. राज्यातील काँक्रीट व दगडांच्या धरणांमधील गळती रोखण्यासाठी राज्यभर "टेमघर पॅटर्न" 
राबवू. असे ही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

दुरुस्ती खर्चात आणखी 40 कोटींची वाढ
गळती दुरुस्ती 2016 ला सुरू झाली त्यावेळी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतू या संबंधी नेमलेल्या समितीने मजबुतीकरणाची स्ट्रेंथ वाढविण्यास सांगितले आहे. त्यामुळे, दुरुस्तीसाठी आणखी 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच सुरवातीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर देखील गुन्हे दाखल करून दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहे असे ही गिरीश महाजन यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We succeeded in preventing leakage of temghar : Girish Mahajan