lo.jpg
lo.jpg

मंचरमधील 'या' कामांबाबत मंत्री वळसे पाटील यांनी केल्या सूचना

घोडेगाव : मंचर येथील क्रीडा संकुलात जॉगिंग ट्रॅक निर्मितीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने मंचर येथे असणाऱ्या तालुका क्रीडा संकुलात चारशे मीटर लांबीचा सिंथेटिक जॉगिंग ट्रक तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाने मंचर क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाच्या व रंगरंगोटीच्या कामाचे नियोजन करावे, आशा सूचना राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मंचर (ता. आंबेगाव) येथील तालुका क्रीडा संकुलाचे नूतनीकरण, व्यवस्थापन व विविध प्रकारच्या नवीन क्रीडा सुविधा निर्माण करण्या संदर्भात राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी आज जिल्हा क्रीडा अधिकारी व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत  आढावा बैठक घेतली.

यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना  सूचना दिल्या. या बैठकीस शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, उद्योजक प्रितमशेठ शहा, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रताप शेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, क्रीडा संकुल समिती सदस्य ऍड. राहुल पडवळ, व्यवस्थापक समीर ढेरंगे, लक्ष्मण थोरात-भक्ते, सुरेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मंत्री वळसे पाटील म्हणाले की "क्रीडा संकुल परिसरात असणाऱ्या बंदीस्त व्यायाम शाळेतील साहित्य नादूरस्थ झाले आहे .क्रीडा विभागाने हे साहित्य तात्काळ बदलावे. बांधकाम विभागाने बॅटमिनटंन हॉल च्या दुरुस्थिचे काम हाती घ्यावे. क्रीडा संकुलाच्या संपूर्ण इमारतीस रंगरंगोटी करावी. क्रीडा संकुलात असणारा बहुउद्देशीय हॉल अद्ययावत करावा .क्रीडा संकुल परिसराला आवश्यकतेनुसार लोखंडी गेट बसविण्याचे नियोजन करावे. तहसीलदार यांनी या सर्व कामांचे नियोजनाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. क्रीडा संकुल दुरुस्ती व नूतनीकरणांच्या कामासाठी लागणाऱ्या निधीच्या उपलब्धतेसाठी मी प्रयत्न करतो."

या आढावा बैठकीत माहिती देताना जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान म्हणाले की, "मंत्री वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार क्रीडा संकुल परिसरात ओपन जिमची उभारणी करण्यात आली असून ती वापरास खुली करण्यात आली आहे.क्रीडा संकुलाच्या सुरक्षिततेसाठी नियमित स्वरूपात दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.क्रीडा संकुळासाठी नियमित व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा संकुल परिसराची स्वछता करण्यात आली आहे. सुमारे सतरा लक्ष रुपये खर्च करून क्रीडा संकुलात असणाऱ्या बंदीस्त व्यायाम शाळेतील व्यायामाचे साहित्य लवकरात लवकर बदलण्यात येईल. या पुढील काळात क्रीडा संकुल परिसरात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करू व त्यानुसार कार्यवाही करू."
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com