esakal | सुविधा दिल्या तरच मालमत्ता कर भरू
sakal

बोलून बातमी शोधा

सुविधा दिल्या तरच मालमत्ता कर भरू

सुविधा दिल्या तरच मालमत्ता कर भरू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वडगाव शेरी : जोपर्यंत विमाननगर परिसरातील समस्या पुणे महानगरपालिका सोडवत नाही आणि आमच्या हक्काच्या मुलभुत सुविधा पुरवित नाही, तोपर्यंत आम्ही मालमत्ता कर भरणार नाही, अशी स्पष्ट भुमिका विमाननगर सिटीझन फोरमने घेतली आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त, महापौर आणि कर संकलन विभागाला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संस्थेमार्फत याविषयी चार महिन्यात पाच वेळा स्मरणपत्र देऊनही प्रशासकीय पातळीवरून कोणतीही हालचाल झाली नसून विमाननगरमधील समस्या कायम आहेत.

हेही वाचा: पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच प्रभाग; निवडणूक आयोगाचे आदेश

ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्या आणि विमाननगर सिटीझन फोरमच्या समन्वयक कनिझ सुखराणी यांनी याबाबत सकाळला माहिती दिली. विमाननगर भागात रस्त्याच्या बाजुला जागोजागी कचरा, राडारोडा पडलेला दिसतो. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. झाडांच्या फांद्या छाटल्यावर त्या जागेवर पडून असतात. सोसायट्यांबाहेरील झाडांचा पालापाचोळा वेळेवर उचलला जात नाही.

विमाननगर भागात रस्त्यांबाबतही अनेक समस्या आहेत. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे वर किंवा खाली झाली आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक पदपथ चालण्यायोग्य नाहीत. जागोजागी अतिक्रमणे झाली आहेत. पथदिवे बंद आहेत. पदपथाला लावलेले रेलिंग तुटले आहेत. रस्ता दुभाजकासाठी लावलेले खांब टुटलेले आहेत. अशा समस्यांचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला.

हेही वाचा: पुणे : राष्ट्र उभारणीची प्रेरणा ‘आयात’ नसावी

सुखराणी यांनी मालमत्ता कर न भरण्याची भुमिका घेतल्यानंतर कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त विलास कानडे यांनी घनकचरा विभाग, पथ विभाग, अतिक्रमण विभाग, उद्यान विभागाला पत्र वाठवून परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याच्या सुचना केल्या आहेत. याबाबत पालिकेचे पथविभाग प्रमुख विजय कुलकर्णी म्हणाले, विमाननगर भागासाठी रस्ता करणे, दुरूस्त करणे आणि पदपथ दुरूस्तीसाठीच्या निविदा काढलेल्या आहेत.

त्यामध्ये पथविभागाशी संबंधीत सर्व समस्या सोडवल्या जातील. नगर रस्ता क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जगताप म्हणाले, कनिझ सुखराणी यांच्या पत्राच्या संदर्भाने सर्व विभागांना सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व समस्या सोडवल्या जातील. विमाननगरध्ये कचरा, खड्डे, राडारोडा, खांबावर लागलेल्या जाहिराती, झाडांच्या पडलेल्या फांद्या, वर खाली असलेली चेंबरची झाकणे, अतिक्रमण यामुळे बकालपणा आला आहे. या समस्या सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत मालमत्ता कर भरणार नाही. - कनिझ सुखराणी (समन्वयक, विमाननगर सिटीझन फोरम)

loading image
go to top