Vidhan Sabha 2019 : विकास आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या जीवावर जिंकू : गिरीश बापट 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''विरोधक हे नावाला सुद्धा उरले नसून भारतीय जनता पक्षाने फक्त विकासाचे राजकारण केले आहे.'', असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचार समारोप प्रसंगी ते बोलत होते.

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''विरोधक हे नावाला सुद्धा उरले नसून भारतीय जनता पक्षाने फक्त विकासाचे राजकारण केले आहे.'', असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचार समारोप प्रसंगी ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले,'कसबा मतदार संघहा कार्यकर्त्यांच्या घामाने बांधलेला असल्यानेच अभेद्य आहे. आणि असाच अभेद्य राहणार आहे. मतदार महायुतीचा उमेदवार निवडून देणार यात शंका नाही. उमेदवार मुक्ता टिळक म्हणाल्या,'विरोधकांकडे कोणते मुद्देच शिल्लक नसल्याने ते वाटेल ते आरोप करत आहेत. गेल्या अडीच वर्षात एवढी काम झाली तेवढी कामं याआधीच कधीच झाली नाहीत. अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. रखडलेल्या मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत. मतदार सगळं बघत असतो. मतदारांनी फरक पहिला आहे. मतदार महायुतीचेच उमेदवार निवडून देणार.'''

सकाळ पासून सुरू असलेल्या पावसात सर्व प्रभागांमधून कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. पावसात सभा सुरू असताना कार्यकर्ते उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will win over Development and workers hard work in maharashtra vidhansabha 2019 Said Girish Bapat