IAS officer Pooja Khedkar: ऑडीला लाल दिवा लावून फिरणाऱ्या IAS पूजा खेडकरची संपत्ती किती? ओबीसी प्रवर्गातून झाली IAS पण आता...

IAS officer Pooja Khedkar: पूजा खेडकर बाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
IAS officer Pooja Khedkar
IAS officer Pooja KhedkarEsakal

Trainee IAS officer Pooja Khedkar Wealth : पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पूजा खेडकरची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमची जिल्हाधिकारी असणार आहेत. दरम्यान पूजा खेडकर बाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा खेडकरचे वार्षिक उत्पन्न ४२ लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तिच्याकडे १७ कोटींहून आधिकची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. साम टिव्हीच्या हाती तिच्या संपत्तीचे विवरण पत्र आले आहे.

संपत्ती आणि नियुक्तीचा नेमका वाद काय?

पूजा खडकरचे उत्पन्न ४२ लाख रूपये इतके आहे. तर संपत्ती १७ कोटी रूपये इतकी आहे. ४२ लाख उत्पन्न असल्यानं ओबीसी प्रवर्गातून IAS झाल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ओबीसी प्रवर्गाला वार्षिक 8 लाख रूपयांच्या उत्पन्नाची मर्यादा आहे. पूजाचे उत्पन्न जास्त असल्याने IAS नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

IAS officer Pooja Khedkar
Puja Khedkar: ऑडीमुळे अडचणीत आलेली IAS पूजा खेडकर कोण? दिव्यांग सर्टिफिकेटचाही घातलाय घोळ?

कोण आहे पूजा खेडकर?

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने २०२१ मध्ये UPSC परिक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत तिचा आखिल भारतीय क्रमांक ८२१ होता. तिने स्वत:ला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती. पूजाचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनाही समान लाभ मिळावा.

IAS officer Pooja Khedkar
IAS Officers : कोणत्या राज्यात सर्वाधिक IAS अधिकारी आहेत तैनात, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com