

Pune city
esakal
IMD Alert: पुणे शहर आणि परिसरात सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील कोथरुड, शिवाजी नगर, औंध, बाणेर या भागांमध्ये ढगांचा गडगडाट सुरु झाला असून रिमझीम पाऊस सुरु झालाय.
बुधवारी राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.