Cloudy Weather
sakal
पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली होती. मात्र, शनिवारी (ता. २८) कमाल तापमान स्थिर राहिले असून, वातावरणात अचानक बदल पाहायला मिळाला. पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांसह पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला.