नेटवर्क डाऊन,नेटकरी वैतागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update monsoon rain affect the internet service Network down pune

नेटवर्क डाऊन,नेटकरी वैतागले

पुणे : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे  मोबाईल नेटवर्क अधूनमधून डाऊन किंवा स्लो होत असल्याचा मनस्ताप पुणेकरांना सोमवारी अनुभवावा लागला. सर्फिंग, डाउनलोडिंग किंवा इतर ऑनलाईन कामे करण्यासाठी इंटरनेटचे स्पीड कमी असल्याने नेटकरी अक्षरशा वैतागले होते. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंटरनेटच्या स्पीडवर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सेवा डाऊन असल्याचे कोणत्याही मोबाइल इंटरनेट सेवापुरवठादार कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मी गोखलेनगर परिसरात राहिला असून एअरटेलचे सिम वापरते. आज सकाळपासून माज्या मोबाईलचे नेटवर्क स्लो होते. काहीवेळ तर सर्फिंग करताना देखील इंटरनेटचे स्पीड कमी होत होते. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला.

- माया सराईकर, मोबाइलधारक

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे हाल

कोरोना सुरू झाल्यानंतर अनेक आयटीयन्स किंवा इतर क्षेत्रातील कर्मचारी घरूनच काम करत आहेत. त्यातील अनेकांची मदार ही मोबाईलच्या इंटरनेटवर आहे. मात्र सोमवार सकाळपासूनच इंटरनेट नीट सुरू नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे काम वेळेवर पूर्ण करताना अनेकांची तारांबळ झाली.

Web Title: Weather Update Monsoon Rain Affect The Internet Service Network Down Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..