खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर वाढला; पाणीसाठा 6.95 टीएमसी

चोवीस तासांत 1.24 टीएमसी पाणी जमा
weather update pune heavy Rain in Khadakwasla dam 6 TMC for water storage pune
weather update pune heavy Rain in Khadakwasla dam 6 TMC for water storage pune sakal
Updated on

किरकटवाडी : खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून मागील चोवीस तासांत चार धरणांत मिळून 1.24 टीएमसी पाणी जमा झाले आहे. खडकवासला धरण परिसराच्या तुलनेत पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. सततच्या पावसामुळे डोंगरांतून लहान-मोठे प्रवाह सुरू झालेले दिसत आहेत. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या चार धरणांत मिळून 742 दशलक्ष घनफूट दाबाने पाण्याची आवक सुरू असून एकूण पाणीसाठा 6.95 टीएमसी(23.83%) झाला आहे. मागील वर्षी या दिवशी 8.66 टीएमसी (29.70%) इतका पाणीसाठा होता.

खडकवासला प्रकल्पातील पाऊस व पाणीसाठा

धरणाचे नाव/आजचा पाऊस (मिलिमीटर)/एकूण पाऊस (मिलिमीटर)/उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी)/टक्केवारी

खडकवासला /22/137/0.96/48.86

पानशेत /85/621/2.74/25.70

वरसगाव /86/602/2.80/21.80

टेमघर /100/703/0.45/12.15

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com