पुणे : चारही धरणात मॉन्सून बरसला

पानशेत येथे १०, वरसगाव येथे १० मिलिमीटर तर व टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली .
weather update rain in pune monsoon fill up four dam khadakwasla dam panshet varsgaon temghar pune
weather update rain in pune monsoon fill up four dam khadakwasla dam panshet varsgaon temghar pune esakal

खडकवासला : मान्सूनचा पाऊस आज सोमवारी खडकवासला धरण साखळीतील चार धरणात बरसला. खडकवासला धरण परिसरात मान्सूनपूर्व पाऊस अद्याप बरसलाच नव्हता. मान्सून कधी बरसणार याची प्रतीक्षा होती. लांबलेल्या मॉन्सूनने अखेर सोमवारी सकाळी सुरवात झाली. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणात बऱ्या पैकी पाऊस पडला. खडकवासला येथे दोन मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे १०, वरसगाव येथे १० मिलिमीटर तर व टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर एक जून पासून खडकवासला येथे ०, पानशेत ३२, वरसगाव ३४ व टेमघर २३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

आतापर्यंत पडलेल्या पावसाने जमीन ओली झाली होती. ऊन पडल्यामुळे ओली झालेली जमीन पुन्हा कोरडी झाली आहे. सातत्याने पाऊस पडत राहिल्यावर जमीन जास्त ओली झाल्यानंतर पाणी वाहून धरणात जमा होण्यास सुरुवात होते. कालवा सुरू होता त्यावेळी, खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत होता. तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. धरण साठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. खडकवासला धरणाच्या कालव्यातून इंदापूर व दौंड तालुक्याला पिण्यासाठी एक हजार १३४ क्युसेक पाणी सोडले जात होते. तो कालवा आज सकाळी पूर्ण बंद केला आहे. इंदापूर व दौंडला सोडलेले पाणी या दोन तालुक्याना १५ जुलैपर्यंत पुरणार आहे. पालखीसाठी कालव्यातून पुन्हा पाणी सोडणार आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे ते पाटस पर्यत पोहचे पर्यंत किमान चार- पाच दिवस पाणी सोडावे लागणार आहे. असे पाटबंधारे विभागाने सांगितले.

सध्या, पानशेत मधून ४५५ क्युसेक, वरसगाव ५३० क्युसेक पाणी सोडले आहे. असे या दोन्ही धरणातून मिळून ९८५ क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे.

खडकवसला धरणातील पाणी साठा

  • खडकवासला- ०.३१/१५.९४

  • पानशेत- १.४९/१४.०२

  • वरसगाव- १.५२/११.८२

  • टेमघर- ०/०

चार धरणात मिळून एकूण ३.३२ टीएमसी /११.४० टक्केवारी पाणी शिल्लक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com