pune weather
sakal
पुणे - गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहे. रविवारी (ता. ५) कमाल तापमान स्थिर राहून किमान तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.