
काटेवाडी : बारामती-इंदापूर तालुक्यातील द्राक्षबागांवर सततच्या हवामान बदलामुळे डाऊनी मिल्ड्यू, भुरी, करपा, तांबेरा आणि जिवाणूजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता आणि वारंवार बदलणारे तापमान, यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत.