Pune: अभियांत्रिकीमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी विशेष वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृता विश्‍व विद्यापीठम्

पुणे : अभियांत्रिकीमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी विशेष वेबिनार

पुणे - बारावीनंतर अभियांत्रिकीक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वेबिनारचे आयोजन केले आहे. अमृता विश्‍व विद्यापीठम् आणि सकाळ यंग इस्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) वतीने २० डिसेंबरपर्यंत हे आयोजन केले आहे. अभियांत्रिकीकडे पॅशन म्हणून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-दळणवळणापासून ते कृत्रीम बुद्धिमत्तेपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन मिळत आहे.

आजपर्यंत दिनेश डी. कुडाचे, महेश्‍वर चैतन्य, डॉ. आतिश पतंगे, डॉ. के. एल. वासुदेव, ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने, ए. एम. अय्यपादास, प्रा. गणेश काकंडीकर, डॉ. एस. ए. लक्ष्मणन, किरण झवारे आणि, डॉ. नवीन कुमार आदी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या वेबिनारसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी क्लिक करा.

हेही वाचा: पुणे : खोटे सोने तारण ठेवून बँकेची ३८ लाखांची फसवणूक

- १८ डिसेंबर
वक्ते : १) प्रकाश मेधेकर - इंजिनिअरिंग कन्सल्टंट अँड सिव्हिल इंजिनिअरिंग

२) आर. प्रमोद - असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अमृता स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, बंगळुरू

विषय: कन्स्ट्रक्शन विथ थ्रीडी प्रिंटर्स, द गेम चेंजर

- २० डिसेंबर
वक्ते : साहिल देव (सह संस्थापक, सी.पी.सी. अ‍ॅनालिटिक्स), प्रा. डॉ. दीपा गुप्ता (अमृता स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, बंगळूर)
विषय : अॅप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर

Web Title: Webinar For Engineering By Amrita Vishwa Vidya Pitham

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top