esakal | लग्न करताय का? मग ही बातमी नक्की वाचाच!
sakal

बोलून बातमी शोधा

लग्न करताय का? मग ही बातमी नक्की वाचाच!

आळंदी आणि लग्नकार्य हे आता समीकरण झाल्याने लग्नाची आळंदी अशीच ओळख आहे. मार्चमध्ये लॉकडाउन घोषित केला आणि मंगलकार्यालये सक्तीने बंद केली. परिणामी गेल्या आठ महिन्यांपासून लग्नसोहळे पार पडले नाहीत.

लग्न करताय का? मग ही बातमी नक्की वाचाच!

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी ः लॉकडाउनच्या परिणामामुळे लग्न समारंभांना बंदी आली. मंगलकार्यालयांचे धंदे बसले आणि वधूवरांनाही लग्नासाठी तब्बल आठ महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली. मात्र आता परंपरेनुसार तुळशीच्या विवाहाच्या मुहूर्तावर लग्नाचे बुकिंग सुरू झाले. मात्र नोव्हेंबरमधे केवळ दोनच तारखा आणि  डिसेंबरमधे कार्तिकी वारीच्या परिणामामुळे लग्नासाठी मंगलकार्यालयांच्या बुकिंगला आळंदीत थंड प्रतिसाद आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची धास्ती विवाहेच्छूक आणि कार्यालय मालकांच्या मनात कायम असल्याने अवघ्या पन्नास शंभर लोकांपर्यंत मर्यादित स्वरूपात लग्न करण्याकडे कल वाढला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आळंदी आणि लग्नकार्य हे आता समीकरण झाल्याने लग्नाची आळंदी अशीच ओळख आहे. मार्चमध्ये लॉकडाउन घोषित केला आणि मंगलकार्यालये सक्तीने बंद केली. परिणामी गेल्या आठ महिन्यांपासून लग्नसोहळे पार पडले नाहीत. मार्च, एप्रिल, मे, जून हा लग्नांचा हंगाम असूनही कमाई सोडा कार्यालयाचे भाडेही अंगावर आले.

भटजींसह, आचारी, वाढपी, डेकोरेशनवाले बेकार झाले. काहींनी लग्ने घेतली मात्र दिर्घकालच्या लॉकडाउमुळे पुन्हा बुकिंगसाठीचे पैसे परत करावे लागले होते. आत लॉकडाउन शिथील झाल्याने मंगलकार्यालय मालक हायसे झाले. विवाहच्छूकांचा लग्नासाठीचा विलंब टळला. मात्र घरगुती पद्धतीने लग्न करण्याचा कल वाढला. अनेकांनी तुळशी विवाहानंतरच्या तारखा बुक केल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगलकार्यालय मालक गिरिष तुर्की आणि संदिप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुळशी विवाहास २५ नोव्हेंबरपासून सुरूवात होत असून, दोनच तिथी आहे. डिसेंबरमधे आठ ते १४ पर्यंत कार्तिकी वारी असल्याने लग्ने नाहीत. कार्तिकी वारीनंतर चार पाच मुहूर्त आहेत. पौष महिन्यात मुहुर्त आहेत मात्र काही लोक लग्न लावत नाहीत. तरिही काहींनी प्रथा बाजूला ठेवून व्यवहारवाद स्विकारला आणि आता थांबलो तर पुन्हा लॉकडाउनमुळे विवाहास प्रतिक्षा करावी लागेल, या भितीने जानेवारीतही बुकिंग केले आहे.  

दरम्यान, जानेवारी सात, फेब्रुवारीत अकरा मुहुर्त आहेत. मात्र हे गौण मुहुर्त आहेत. त्यानंतर कोरोनाची साथ ओसरली तर मार्च महिन्यापासून मंगल कार्यालयांना बुकिंगला प्रतिसाद मिळेल. सध्या कार्यलयांची संख्या वाढल्याने स्पर्धा वाढली. परिणामी कमी खर्चात लग्ने आळंदीत लावली जातात. सध्या तरी कोरोनाचे सावट कायम असून, मोठ्या लग्नांपेक्षा कमी लोकांत लग्न लावून खर्चही कमी प्रमाणात व-हाडी करत असल्याचे चित्र आहे. 

ऋषिकेश डहाके आणि आकाश जोशी यांच्यासारखी अनेक तरूणाई रोजगार नसल्याने लग्न लावल्याच्या व्यवसायात उतरले आहेत. त्यांनी सांगितले की, घरगुती स्वरूपात अनेक लोक लग्न लावत आहेत. थाटमाट, डामडौल टाळून मर्यादित स्वरूपात, कमी खर्चात लग्न लावण्याचा सध्या कल वाढला आहे. रजिस्टर पद्धतीने लग्नांची संख्या वाढली. यामुळे वाढपी, आचारी, बॅण्डवाले, मंडप डेकोरेटर यांच्या धंद्यावरही परिणाम झाला आहे. अनेक वाढपी महिला-पुरूष चाकणला कंपनीत काम करत आहेत.

एकंदर आळंदी कार्यालय गेली अनेक वर्षे प्रचंड नफ्यात होती. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने आणि शंभर दीडशे लोकांत लग्न लावण्याचा कल वाढल्याचा परिणाम मंगल कार्यालय व्यावसायिकांवर दिसून येतो. परिणामी कार्यालय बुकिंगला थंडा प्रतिसाद आहे. कार्यालयांना एकमेव आशा आहे ती धंदा पुढील वर्षी मार्चनंतरच जोमात चालण्याची. मात्र कोरोना हद्दपार झाला तरच.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुलशी विवाह सुरुवात २६ ते ३० नोव्हेंबर
१) नोव्हेंबरमधे मुहुर्त......२७, ३०
२) डिसेंबरमधे मुहुर्त.......७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७.
३) पोलिसांकडे किमान साठ कार्यालय चालकांची नोंद.
४) पालिकेकडे धर्मशाळा आणि मंगलकार्यालयाची अडिचशेहून अधिक नोंद.
५) पंधराशेहून अधिक आचारी, बॅण्डवाले, मंडप, वाढपी, पुरोहित, भाजीविक्रेते, दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे किमान पंधराशे लोक आर्थिक अडचणीत.
६) कमी खर्चात आणि केवळ नातेवाईकांच्या उपस्थिती लग्न समारंभ.
७) आळंदी किमान तीस ते चाळिस रजिस्टर लग्ने दिवसाला होतात. 

८) कोरोना हद्दपार झाला तर वर्षी मार्चनंतर लग्नांना जोर. 
९) आळंदीतील लग्नांमुळे होणारे ध्वनिप्रदुषण, वाहतूक कोंडी आटोक्यात.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image