esakal | लग्नसोहळ्यातुन वधु-वरांचे पावणे तीन लाखांचे दागिने पळविले 
sakal

बोलून बातमी शोधा

thief

लग्नसोहळ्यातुन वधु-वरांचे पावणे तीन लाखांचे दागिने पळविले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : लग्न सोहळ्यामध्ये वधू-वरांसाठी घेतलेल्या तब्बल पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी पिशवीतून काढून नेले. ही घटना 25 ऑगस्ट रोजी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊली गार्डन मंगल कार्यालयात घडला. 

याप्रकरणी गोकुळनगर येथे राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या लहान भावाने 25 ऑगस्ट रोजी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माउली गार्डन मंगल कार्यालयामध्ये लग्न होते. त्यासाठी फिर्यादी व त्यांचे नातेवाई सकाळी दहा वाजता तेथे पोचले. त्यानंतर फिर्यादीने वधु-वरासाठी घेतलेले पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने एका पिशवीमध्ये भरुन वरासाठीच्या खोलीमध्ये ठेवून दिले होते. लग्नाच्यावेळी गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने वराच्या खोलीमध्ये जाऊन पिशवीमध्ये ठेवलेले सर्व दागिने काढून नेले. लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व वराकडील मंडळी वस्तुंची आवराआवर करीत होते. त्यावेळी त्यांना दागिने ठेवलेल्या पिशवीतील दागिने अनोळखी व्यक्तींनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे आरोपीचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे. 

loading image
go to top