माण तालुक्यातील शनिवार व सोमवारचे आठवडा बाजार बंद
माणमध्ये शनिवार, सोमवारी
आठवडा बाजार बंद
दहिवडी, ता. ५ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान व मतमोजणी दिवशी माण तालुक्यातील विरळी, वावरहिरे, पळशी व दहिवडी येथील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी माण विकास अहीर यांनी दिले आहेत.
शनिवारी असणारे विरळी, वावरहिरे व पळशी, तर सोमवारी दहिवडी येथे भरणारा आठवडा बाजार बंद राहणार आहे. आठवडा बाजार सोमवार ऐवजी मंगळवारी (ता. १०) भरविण्यात येणार आहे. संबंधित व्यापारी, शेतकरी, ग्राहक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, ही विनंती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

