

Dr. Neelam Gorhe
esakal
पुणे - ‘पुणे जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुलगा-मुलगी समानतेची जाणीव घराघरांत निर्माण करणे आवश्यक आहे. मुलासाठी महिलांवर येणारा दबाव दूर करण्यासाठी केवळ आईचे नव्हे, तर वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचेही समुपदेशन करावे,’ अशा सूचना विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.