पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस

राधाकृष्ण कापसे
शुक्रवार, 23 जून 2017

टेमघर, वरसगाव या धरणाच्या भिंतीत गळती झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धरणे पूर्ण रिकामी केली होती. त्यामुळे आता या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे

खडकवासला - पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणात पाऊस पडत आहे. खडकवासला वगळता उर्वरित तीन धरणात एक जून पासून सुमारे 100 मिलिमीटर पाऊस पडला आहे. 

शुक्रवारी सकाळी सहा वाजता/मागील 24 तासात 
टेमघर येथे 16, पानशेत येथे 12, वरसगाव येथे 11; तर खडकवासला येथे 3 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एक जून पासून टेमघर येथे 106, पानशेत येथे 105, वरसगाव येथे 102 तर खडकवासला येथे 56 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. 

4 टक्के जास्त पाणी साठा
टेमघर, वरसगाव या धरणाच्या भिंतीत गळती झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धरणे पूर्ण रिकामी केली होती. त्यामुळे आता या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेत धरणात 2.53 टीएमसी 23.80 टक्के तर खडकवासला धरणात 0.25 टीएमसी म्हणजे 12.59 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या चार ही धरणात 2.78 टीएमसी (9.55 टक्के) पाणी साठा शिल्लक आहे. तो मागील वर्षी पेक्षा 4 टक्के जास्त पाणी साठा आहे.

Web Title: Welcome rain in Pune's dams