पुणे : अपघातास कारणीभूत ठरलेली अष्टापुर येथील 'ती' विहिर बुजवणार

पुणे : अपघातास कारणीभूत ठरलेली अष्टापुर येथील 'ती' विहिर बुजवणार

लोणी काळभोर : अष्टापूर हद्दीत चारचाकी मोटार विहिरीत कोसळून तीन ठार...उरुळी कांचन येथील खेडेकर मळ्यात रस्तालगतच्या विहिरीत चारचाकी वाहन कोसळून दोन जण ठार...मांडवगण फराटा येथे स्विफ्ट पाण्यात कोसळून चार ठार...सांगलीत रस्त्यालगतच्या विहिरीत वॅगनआर कोसळून पाच ठार...फुरसुंगी हद्दीतील रस्त्यालगत कॅनॉलमध्ये चारचाकी कोसळून एक शिक्षक ठार अशा अनेक बातम्या मागील काही वर्षापासून वाचल्या जात आहेत.

पुणे जिल्हात मागील पाच वर्षाच्या कालावधीत रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरीत चारचाकी अथवा मोटारसायकल कोसळून झालेल्या अपघातात पन्नासहून अधिक जणांना जीव गमवावे लागले आहे. केवळ पूर्व हवेलीत मागील वर्षभराच्या काळात, उरुळी कांचन हद्दीत खेडेकरमळ्यात दोनजण मृत्युमुखी, फुरसुंगी हद्दीत एका शिक्षक व एक कामगार असे दोन जणांसह अष्टापूर येथील तीन जण अशा सात जनांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र, अशा अपघातात जीव गमवावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडुनही, रस्त्यालगत असणाऱ्या एकही विहिरीला कठडा बांधण्याबाबत शासनाने आदेश दिल्याचे आढळून आलेले नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अष्टापुर येथील अपघातात शितल कोतवालसह, त्यांच्या दोन लहान मुलांना चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याने जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर रस्त्यालगच्या विहिरींना कठडे बांधले जावेत की नाही याबाबत पाटबंधारे विभाग अथवा महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कठड्यांच्या बांधकामाबाबत कसलेच धोरण नसल्याची बाब पुढे आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील विविध रस्तांच्या अगदी खेटून विहिरी आहेत. अपवाद वगळता बहुतांश विहिरींना कठडे नसल्याने, मोटारसायकल अथवा चारचाकी वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात अनेकांना जीव लागले आहेत. अपघात झाला की कठडे नसल्याची व कठडे बाधण्याबाबत काही दिवस चर्चा होती. मात्र, काही दिवसानंतर चर्चा हवेतच विरुन जाते. मात्र शितल कोतवाल यांच्यासह त्यांच्या दोन मुलांच्या मृत्युने विहिरींच्या कठड्याबाबतचा मुद्दा चर्चेला आला आहे. आमदार अशोक पवार यांनी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर व सार्वजणिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सी. एन. कुलकर्णी यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यानंतर, दोन्ही खात्यांची धावपळ सुरु झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत महसुल विभागाच्या वतीने बोलताना हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर म्हणाले, हवेली तालुक्यातील सर्वच रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या विहीरीची माहिती घेण्याच्या सूचना गावकामगार तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच रस्त्यालगत असणाऱ्या ज्या-ज्या विहिरींना कठडे नसतील, अशा विहिरींच्या मालकांना नोटीसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हा विषय रस्ताची मालकी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत अशोक पवार म्हणाले, हवेली व शिरुर तालुक्यात मागील पाच वर्षाच्या काळात मोटारसायकल अथवा चारचाकी वाहन विहीरीत कोसळुन झालेल्या अपघातात दहाहुन अधिक जनांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजणिक बांधकाम विभागाने रस्ताच्या बाजूच्या विहिरींना कठडे बांधण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच महसूल विभागाने याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, वरील दोन्ही खाती लक्ष देत नसल्यानेच, शितल कोतवाल व त्यांच्या दोन लहानग्यांना जीव गमवावा लागला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रस्त्यालगतच्या विहिरींना कठडे बांधून घेण्याची जबाबदारी नेमकी कोणाची याबाबत माहिती घेण्याचे काम चालू आहे. याबाबत आगामी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी लावणार असुन, यापुढील काळात असे अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु करणार आहे. 

अष्टापुर येथील विहिर बुजवणार 

दरम्यान, शितल कोतवाल व त्यांच्या दोन मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेली विहिर तात्काळ बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार अशोक पवार व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष जगताप यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, विहीर तात्काळ बुजविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com