
‘विस्मा’च्या अध्यक्षपदी ठोंबरे, तर उपाध्यक्षपदी रोहित पवार
पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) अध्यक्षपदी ‘नॅचरल शुगर’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, तर उपाध्यक्षपदी ‘बारामती ॲग्रो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. ही निवड सप्टेंबर २०२४ पर्यंत राहील.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही राज्यातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक २०२१-२४ या कालावधीसाठी झाली. यात ११ सदस्य बिनविरोध निवडून आले. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या अध्यक्षांची असोसिएशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली.
विभागनिहाय सदस्यांची नावे :
दक्षिण महाराष्ट्र : माधवराव घाटगे (अध्यक्ष- गुरुदत्त शुगर्स), योगेश पाटील (कार्यकारी संचालक- अथणी शुगर्स), रोहित नारा (संचालक- सद्गुरू श्री साखर कारखाना).
मध्य महाराष्ट्र : पांडुरंग राऊत (अध्यक्ष- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना), यशवर्धन डहाके (अध्यक्ष- पराग ॲग्रो फूड्स), रणजित मुळे (कार्यकारी संचालक- गंगामाई इंडस्ट्रीज).
मराठवाडा आणि खानदेश : रोहित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी -‘बारामती ॲग्रो’), महेश देशमुख (अध्यक्ष- लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज), बजरंग सोनवणे (अध्यक्ष- येडेश्वरी ॲग्रो).
विदर्भ : बी. बी. ठोंबरे (अध्यक्ष- नॅचरल शुगर), समय बनसोड (संचालक- मानस ॲग्रो इंडस्ट्रीज).
तज्ज्ञ व्यक्ती : हरिभाऊ बागडे (अध्यक्ष- छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग), रवी गुप्ता (अध्यक्ष- रेणुका शुगर्स),
खास निमंत्रित : आमदार संजय शिंदे (अध्यक्ष- विठ्ठल कॉर्पोरेशन).