Pune News : ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती हॉटेल ग्रीन पार्कचा उपक्रम

हरित ऊर्जेला चालना, वर्षाकाठी लाखोची बचत
ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती हॉटेल ग्रीन पार्कचा उपक्रम
ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती हॉटेल ग्रीन पार्कचा उपक्रम sakal

शिवाजीनगर : हॉटेलमध्ये ग्राहकांच्या ताटात शिल्लक राहिलेले अन्न, भाजीपाल्यांची देठं, फळांची सालं असा दररोज जवळपास ३०० ते ५०० किलोपर्यंत जमा होणारा 'ओला कचरा' हॉटेलच्या मोकळ्या जागेत उभा केलेल्या बायोगॅस प्रकल्पात टाकला जातो,

या प्रकल्पामधून दिवसाला १५ ते २० किलोपर्यंत बायोगॅस निर्मिती होत असून महापालिकेला कचरा उचलण्यासाठी द्यावे लागणाऱ्या पैशात देखील बचत होते. यामुळे वर्षाकाठी जवळपास लाखो रूपयांची बचत होत आहे.

यासह सेंद्रीय खताची निर्मिती, हरित ऊर्जेला चालना, पर्यावरण पुरक प्रकल्प असल्याने प्रदुषण देखील कमी होते. असे विविध फायदे या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहेत.

बाणेर रस्त्यावर असलेल्या 'हॉटेल ग्रीन' पार्क येथे सहा वर्षांपासून

बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार महापालिका क्षेत्रात असलेल्या खाजगी आस्थापना हॉटेल, मंगल कार्यालय, सोसायटी यांच्याकडे १०० किलो पेक्षा जास्त घनकचरा निर्माण होत असेल तर तो कचरा संबंधित आस्थापनाच्याच नागरिकांनी त्याची विल्हेवाट लावायची आहे. असा नियम करण्यात आला आहे.

या नियमांचे पालन हॉटेल ग्रीन पार्क मध्ये होत असल्याने स्वच्छतेबाबत एक आदर्श उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. शहरात अनेक मंगल कार्यालय, हॉटेल, सोसायट्या आहेत. अशा प्रकारेचे प्रकल्प उभारले तर त्यामधून घनकचरा व्यवस्थापन होईल तसेच प्रदूषण देखील कमी होईल.२०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार महापालिकेने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

बायोगॅस प्रकल्पाविषयी

-२०० ते ५०० स्क्वेअर फूट जागेत प्रकल्प उभा करता येतो

- आंदाजे १५ ते २५ लाख रुपये खर्च

- प्रकल्पाचे आयुर्मान २५ वर्ष

- अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाकडून ठराविक अनुदान

प्रकल्पाचे फायदे

- पर्यावरण पुरक पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट

- घरगुती गॅस ( एलपीजी) सिलेंडरची बचत

- महापालिकेला कचरा उचलण्यासाठी द्यावे लागणाऱ्या पैशात बचत

- हरित ऊर्जेला चालना

- कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी

- प्रकल्पातून निघणारा सेंद्रिय खत बागेमध्ये, शेतात वापरता येतो

"बायोगॅस प्रकल्प उभारणीला चालना मिळावी या उद्देशाने महापालिकेने संबंधित आस्थापनांना प्रकल्प उभा केल्यावर ५ ऐवजी १० टक्के मिळकतीवर सूट द्यावी. महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान द्यावे. प्रकल्पाचे पर्यावरणपूरक व आर्थिक फायदे कोणकोणते आहेत? या विषयी प्रशासनाकडून जनजागृती करणे गरजेचं आहे.

- गजानन पाटील, कार्यकारी संचालक, ऊर्जा बायो सिस्टीम

"बायोगॅस प्रकल्प उभा केल्यापासून कचरा घेऊन जाण्याचा खर्च वाचला, दररोज १५ ते २० किलो (एलपीजी ) गॅसची बचत झाली. यासह प्रकल्पाचे अनेक फायदे आहेत. आपण सगळ्यांनीच महापालिकेवर अवलंबून न राहता, आपले मार्ग शोधले पाहिजेत. बायोगॅस मध्ये देखील नवीन तंत्रज्ञान आले आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा. असे प्रकल्प उभा केले तर, शहर स्वच्छ राहील व आजारही कमी होतील.

- चंद्रकांत निम्हण, हॉटेल ग्रीन पार्क, बाणेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com